![]() |
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. रामदास बिर्जे |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
१० वी चे वर्ष महत्वाचे आहे. यासाठी अखंड खडतर परिश्रमाची गरज आहे. पण जर मन, मेंदू आणि मनगट मजबूत असेल तर जीवनात कोणत्याही अवघड असणाऱ्या परिक्षेत उज्वल यश संपादन करता येते असे विचार प्रा. रामदास बिर्जे यानी व्यक्त केले.
श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड ) येथील इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात प्रा बिर्जे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी होते.
यावेळी प्रास्ताविक व स्वागत वर्गशिक्षक एस. के. पाटील यांनी केले. बंकट दिशेबकर, एस. एन. पाटील, एस. डी. पाटील, आर. डी. पाटील, जे. व्ही. कांबळे, संध्याराणी देसाई यांनी मनोगते व्यक्त केली. तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल अंजली पवार हिचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. प्राचार्य श्री सुर्यवंशी यानी अध्यक्षिय मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचालन पी. के. पाटील यांनी केले तर आभार बी. पी. गावडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment