मराठी पत्रकार परिषद शिष्टमंडळाने घेतली विधानपरिषद उपसभापतींची भेट - चंदगड लाईव्ह न्युज

28 February 2023

मराठी पत्रकार परिषद शिष्टमंडळाने घेतली विधानपरिषद उपसभापतींची भेट

 

नीलम ताई गोरे यांना पत्रकारांच्या मागण्यांचे निवेदन देताना एस एम देशमुख व मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी

मुंबई : सी. एल. वृत्तसेवा 

       राजापुर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्या झाली. यापूर्वीही गेल्या २५-३० वर्षात २१ पत्रकार निर्दयपणे संपविण्यात आले. अनेक घटनांमध्ये आरोपींचा मागमूस लागला नाही की शिक्षा झाल्याचे उदाहरण नाही. पत्रकारांवरील वाढते हल्ले व पत्रकारांचे अनेक प्रलंबित प्रश्न यासह विविध मागण्यांबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज मुख्य विश्वस्त  एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांची भेट घेतली. 

         शशिकांत वारीशे हत्याप्रकरण आणि पत्रकारांवरील हल्ले याबाबत चर्चा करून काही मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. यावेळी विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे,  विभागीय सचिव दीपक कैतके आणि मुंबई अध्यक्ष राज आदाटे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment