हलकर्णी महाविद्यालयात लोककला भित्तीपत्रकाचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

01 March 2023

हलकर्णी महाविद्यालयात लोककला भित्तीपत्रकाचे उद्घाटनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

           हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा दिनाच्या निमित्ताने आयोजित उपक्रमात 'लोककला' विशेषांक या भित्तीपत्रकाचे उद्घाटन गोपाळरावजी पाटील आणि प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर  यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. लोककला विशेषांकात तमाशा, लावणी, भारुड, पोवाडा , वासुदेव अशा विविध लोककलांविषयीचे विद्यार्थ्यांनी लेखन केले आणि एक सुंदर विशेषांक मराठी विभागाच्या वतीने संपन्न झाला. 

       यावेळी  प्राचार्य डॉ. अर्जुन चव्हाण, प्रा. डॉ. अरुण शिंदे, प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे यांसह अशोक जाधव, संजय पाटील,विशाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भित्तीपत्रक विशेषांकाची संकल्पना आणि भूमिका डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी मांडली तर डॉ. अनिल गवळी यांनी मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:

Post a Comment