तेरवण- रामघाट नजीक अपघात, चंदगड तालुक्यातील तरुणाचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

09 February 2023

तेरवण- रामघाट नजीक अपघात, चंदगड तालुक्यातील तरुणाचा मृत्यू


दोडामार्ग,  दि. ९ फेब्रुवारी प्रतिनिधी

          मोर्ले ते पारगड हेरा असा मोटार सायकल प्रवास करताना शुक्रवारी पहाटे मोटार सायकल वरिल ताबा सुटून अतिवेगात असलेली मोटार सायकल दगडावर चढून  झालेल्या भिषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी दोडामार्ग पोलीस स्थानकात मोटार सायकल चालकावर स्वताच्या मृत्यूस जबाबदार तसेच साक्षीदार याच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती दोडामार्ग पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांनी दिली. 

           दोडामार्ग पोलिस स्थानकातून दिलेल्या माहितीनुसार 

2. आरोपी नाव पत्ता- रोहित अशोक वय - 25 (रा. हेरे ता. चंदगड)

3. गुन्हा घडला तारीख वेळ ठिकाण - तेरवण राम घाटीवाडीवाडी दि. 09/02/2023 रोजी पहाटे 03-30 वा.चे पूर्वी

4. गुन्हा दाखल ता. वेळ - दि.09/02/2023 रोजी  15.02 वा

तपासी अधिकारी - अधिकारी पोलीस निरीक्षक दोडामार्ग पोलीस ठाणे

 हकीगत - वरील तारखेस वेळी व जागी आरोपीत  हा आपले ताब्यातील पल्सर मोटरसायकल नंबर Mh09 CT-5493 ही घेऊन मोटरसायकलच्या पाठीमागे मित्र अक्षय मोहन हेरेकर रा.हेरे चंदगड यास घेऊन गोवा येथून पारगड मार्गे गावी हेरे येथे येत असताना तेरवण  राम घाटवाडी वळनावर आला असता आरोपीत याच्या ताब्यातील मोटरसायकलचा ताबा सुटून दगडावर मोटरसायकल चढून अति वेगाने गाडी चालवून  दोघे खाली पडून  स्वतःच्या मृत्यूस व साक्षीदार याचे गंभीर दुखापतीस गाडीचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणून .दोडामार्ग नं.16/2023 भादवि कलम - 304(a) 279,337,338,427, एम व्ही ऍक्ट 184 प्रमाणे 1' फिर्यादी- श्रीनिवास नेमनात वन कुंद्रे वय - 42 राहणार- हेरे तालुका चंदगड 2. आरोपी नाव पत्ता- रोहितअशोक वय - 25 रा. हेरे ता. चंदगड

3. गुन्हा घडला तारीख वेळ ठिकाण - तेरवण राम घाटीवाडीवाडी दि. 09/02/2023 रोजी पहाटे 03-30 वा. चे पूर्वी आर. बी. अधिकारी, पोलिस निरीक्षक, दोडामार्ग पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment