पारगड येथील भवानी देवीची शनिवारी यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

03 February 2023

पारगड येथील भवानी देवीची शनिवारी यात्रा

 


 चंदगड/प्रतिनिधी 
पारगड (ता. चंदगड) येथील ऐतिहासिक भवानी देवीची वार्षिक यात्रा शनिवार दि. ४ व रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त ग्रामस्थांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. दि. ४ रोजी सकाळी लघुरूद्राभिषेक, आरती, गोंधळ व माही यात्रा होणार आहे. तर दि. ५ फेब्रुवारी रोजी नाट्य संपदा गोवा असोसिएशनचे इथे ओशाळला मृत्यू हा ऐतिहासिक नाट्य प्रयोग होणार आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कान्होबा माळवे, रघूवीर शेलार, प्रकाश चिरमुरे यानी केले आहे.


No comments:

Post a Comment