संवर्ग -४ मधील शिक्षकांच्या व्यथा कोण जाणणार ? - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2023

संवर्ग -४ मधील शिक्षकांच्या व्यथा कोण जाणणार ?

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         सध्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. जात आहेत. त्यातील बहुतांशी शिक्षक हे तंत्रस्नेही, शिष्यवृत्ती मार्गदर्शक आहेत. ज्यांनी आपल्या कार्यातून व अथक परिश्रमाने शाळेचे अर्थात तालुक्याचे नाव सुद्धा उंचावलेले आहे. एकदा हे शिक्षक पर तालुक्यात गेले आणि शिक्षक भरती झाली तर त्याचा सर्वात मोठा फटका आताच्या बदली पात्र शिक्षकांना बसणार आहे. 

       कारण नवीन भरती झालेले शिक्षक कमीत कमी दहा वर्षे एकाच  शाळेत राहणार आहेत. दहा वर्षानंतर ज्यावेळी ते बदली पात्र होतील तोपर्यंत आता बाहेर गेलेले सर्व शिक्षक सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणार आहेत. म्हणून कोणत्याही तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक व  शिष्यवृत्ती मार्गदर्शक हे पर तालुक्यात गेल्यावर घरापासूनच्या अंतरामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. शिवाय दररोजचा प्रवास तोही निदान पाच वर्षे त्यांना करावाच लागणार आहे.

       या व्यथा ऐकून घेण्याची मानसिकता मात्र प्रशासनाची अथवा संगणक प्रणालीची नसल्याचे दिसून येत आहे.या सर्व शिक्षकांची उमेद मारली जाणार आहे हे कटू असतं काय कारण या यातील बहुतांश शिक्षकांना द्वि शिक्षकी व घरापासून दूर असणाऱ्या अवघड क्षेत्रातच शाळा मिळणार आहेत. शाळेची पटसंख्या कमी असेल तर त्यांचा टॅलेंट ते पूर्ण क्षमतेत वापरू शकतील का हेही चिंतनिय आहे. यातील अनेक शिक्षक हे जिल्हा बदलीने या जिल्ह्यात आलेले आहेत परजिल्ह्यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थिती काम करायचे स्वतःच्या जिल्ह्यात आल्यानंतर आता कुठे कुटुंब स्थिरावत असताना पुन्हा अनिश्चित काळासाठी घरापासून दूरच्या ठिकाणी नोकरी करायची. 

          या मानसिकतेचा विचार होणार की नाही. गडहिंग्लज मधला शिक्षक कागल मध्ये, कागल मधला शिक्षक राधानगरीमध्ये, राधानगरीचा शिक्षक गगनबावड्यामध्ये, शिरोळ मधला शिक्षक शाहुवाडी मध्ये, करवीर मधला शिक्षक पन्हाळ्यामध्ये, पन्हाळ्यातला शिक्षक बावड्यामध्ये या पद्धतीने सर्वांनाच अस्थिर करून ही बदली प्रक्रिया काय साध्य करणार आहे. या बदली प्रक्रियेतील अनेक प्रश्नांचे मूळ हे न झालेली नोकरभरती आहे. नोकर भरती अनिश्चित आहे पण जेव्हा नोकर भरती होईल. तेव्हा किमान संवर्ग चार मधील बदली होऊन जाणाऱ्या बांधवांचा सहानुभूतीने विचार करून त्यांना शाळेतील सेवेची अट तीन वर्ष करण्याबाबत सकारात्मक विचार व्हावा आणि नवीन सेवेत येणाऱ्या शिक्षकांना या शाळा देण्यात याव्यात. याबाबत संघटनात्मक पातळीवरती प्रयत्न होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment