जेऊरच्या कब्बड्डी स्पर्धेत तेऊरवाडीचा शंभूराजे संघ अजिंक्य - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2023

जेऊरच्या कब्बड्डी स्पर्धेत तेऊरवाडीचा शंभूराजे संघ अजिंक्य

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        जेऊर (ता. आजरा) येथे झालेल्या ५२ किलो वजनी गटातील कब्बड्डी स्पर्धेत तेऊरवाडी (ता चंदगड) येथील शंभूराजे कब्बड्डी संघाने प्रथम क्रमांक मिळवला. याबरोबरच  ५५  किलो वजनी गटामध्ये साळगाव (ता. आजरा) येथे झालेल्या कब्बडी स्पर्धे मध्ये दुसरा क्रमांक मिळवला.  पूर्वी पासून  कुस्ती क्षेत्रात दबदबा असलेल्या तेऊरवाडी गावा मधील युवकांनी कब्बड्डी क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला आहे.

        या संघात रोहन पाटील, स्वागत पाटील (बेस्ट डिपेंडर), सुशांत पाटील, रोहन भिंगुंडे, रोहन पाटील, प्रतिक पाटील, ओमकार पाटील, प्रमोद पाटील, सौरभ पाटील, आकाश भिंगुडे, विनायक पाटील, कार्तिक पाटील या खेळाडूंचा  समावेश आहे. संघ व्यवस्थापक  एम. ए. पाटील आहेत. तर या खेळाडूंना विश्वास पाटीत यांचे मागदर्शन लाभत आहे. सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment