आमरोळी येथील कॉलेज युवक बेपत्ता, शोधाशोध सुरुच..... - चंदगड लाईव्ह न्युज

02 February 2023

आमरोळी येथील कॉलेज युवक बेपत्ता, शोधाशोध सुरुच.....

 


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         आमरोळी (ता. चंदगड) येथाल शुभम संजय धरमले (वय  १७ वर्षे) हा युवक बेपत्ता झाला असल्याची तक्रार चंदगड पोलिसात करण्यात आली आहे. आमरोळी येथील आपल्या घरातून मंगळवार दि ३१ जानेवारी रोजी दुपारी  शुभम बकरी चारण्या साठी गावाजवळील शेतामध्ये गेला होता. पण त्या शेता मधून शुभम बेपत्ता झाला आहे. ग्रामस्थांनी व घरच्यानी शुभमचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण अद्याप त्याला यश मिळाले नाही. तरी हा तरूण कोणाला आढळल्यास त्वरीत चंदगड पोलिस अगर पुढील नंबरवर संपर्क साधन्याचे आवाहन कुटूंबियांनी केले आहे. संपर्क - 07026024806, 08390875115.No comments:

Post a Comment