संग्रहित छायाचित्र |
माडवळे (ता. चंदगड) येथील शिवारात हत्तीच्या कळपांकडून काल रात्री ऊसपिकाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. पांडुरंग रामा दळवी,म्हात्रू कृष्णा पारशे (रा. माडवळे) या शेतकऱ्यांच्या ऊस पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हत्तींनी कर्नाटकातील धामणे परिसरात गेला आहे.काल रात्री दहाच्या सुमारास पाच हत्तीचा कळप कोदाळी, धनगर वड्यावरून माडवळे गावाजवळील पार्शी वाडा परिसरात घुसला होता. याबाबतची माहिती मिळताच गावातील काही ग्रामस्थांनी या हत्तीच्या कळपाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा कळप पुढे हाजगोळी मार्गाने धामणे असा कर्नाटक हद्दीत निघून गेला आहे.
दरम्यान, हत्तींनी दळवी व पारशे यांच्या ऊस पिकांसह इतर शेताचेही नुकसान केले आहे. या घटनेची माहिती मिळताच नारायण गावडे व वनकर्मचारी शिंदे यांनी नुकसानीचा पंचनामे केला आहे. अथर्व (दौलत) साखर कारखान्याचे शेतीगट अधिकारी पुंडलिक बिर्जे यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी पाहणी केली आहे. तसेच नुकासानग्रस्त भागातील ऊसाची लवकरच उचल केली असे सांगितले.
यावेळी नेमाणा नंदकुमार गावडे, सुरेश जनबा पारशे, जोतीबा धनाजी गावडे, संतोष नंदकुमार गावडे, गणपत वाघोजी पवार, रवळू सुरेश गावडे, शिवराज नामदेव दळवी, मारुती कृष्णा मसुरकर, गोविंद पारशे आदी शेतकरी उपस्थित होते.पाटणे वनक्षेत्रात हत्तींचा वावर असून या कळपाचा या परिसरात नेहमी ठराविक कालावधीत वावर असतो. कोदाळी, बांद्राई धनगरवाडा, जंगमहट्टी, माडवळे, पार्शीवाडा, हाजगोळी मार्गे धामणे असे कर्नाटक हद्दीत असा त्यांचा मार्ग आहे.
त्यामुळे दरवर्षी हा कळप या परिसरात येतो. मात्र, अशा वेळी ग्रामस्थांनी त्यांना त्यांच्या मार्गे जावू द्यावे, जेणेकरून नुकसान कमी होईल. या कळपाला उस्कवून लावण्याच्या प्रयत्नात हा कळप अधिक बिथरतो आणि आसपासच्या शेताचे देखील अधिक नुकसान होते. त्यामुळे अशा वेळी शक्यतो शेतकऱ्यांनी संयम ठेवून या हत्तींना आपल्या मार्गे जावू द्यावे असे आवाहन वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment