![]() |
हिंडोल्कोच्या मैदानावर चंदगड पोलिसांच्या जर्शीचे अनावरण करताना पोलिस व पत्रकार. |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
पत्रकार दिनानिमित्त चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने 'पत्रकार,ऑफिसर्स, सोशल वर्कर्स प्रीमियर लीग- २०२३' क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्या शनिवार दि. ११ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता मडखोलकर महाविद्यालय क्रीडांगण चंदगड येथे होत आहे. तालुका वासीयांना उद्यापासून या क्रिकेट सामन्यांचा थरार पाहायला मिळेल.
स्पर्धेसाठी २४ संघांची एका गटात ६ संघाची गटात विभागणी करण्यात आली असून एकूण ४३ सामने होतील. ते माडखोलकर महाविद्यालय व हिंडाल्को क्रीडांगण हिंडगाव (बेळगाव वेंगुर्ला हायवे) येथे ११, १२, १८, १९, २५ व २६ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय सुट्टी दिवशी होतील.
२६ रोजी राज्य व राष्ट्रीय खेळाडू व मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. तालुक्यात अशा प्रकारची स्पर्धा प्रथमच होत असल्याने स्पर्धेबाबत नागरिकांत कमालीची उत्सुकता आहे. स्पर्धा संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरणार असून क्रिकेट सामन्यांचा आस्वाद तालुक्यातील क्रिकेट प्रेमींनी घ्यावा असे आवाहन चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
चंदगड
तालुका पत्रकार संघाच्या वतीने आय़ोजित पत्रकार, ऑफिसर्स व सोशल वर्कर्स क्रिकेट
लीग २०२३ मधील फायनल झालेले २४ संघ
1 आरोग्य विभाग
2
वकील असोशिएशन
3
खेडूत स्पोर्ट्स
4
तहसिल कार्यालय
5
पोलिस ठाणे
6
प्राथमिक शिक्षक अ
7
एल. आय. सी.
8
एस. टी. महामंडळ
9
पत्रकार संघ
10
महावितरण
11
न्यायालय
12
पोलिस पाटील
13
कृषि विभाग
14
पंचायत समिती
15
बँक ऑफ इंडिया
16
नगरपंचायत
17
पाटणे वन विभाग
18
चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन (डॉक्टर) टीम
19
सी. एस. सी. टीम
20
निम शासकीय पतसंस्था टीम
21
बॅक ऑफ बडोदा
22
माजी सैनिक
23
प्राथमिक शिक्षक ब
24
चंदगड वन विभाग
No comments:
Post a Comment