चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक मेहताब नाईक अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2023

चंदगड नगरपंचायतीचे नगरसेवक मेहताब नाईक अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

मेहताब नाईक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        चंदगड नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक मेहताब आयुब नाईक यांना तीन अपत्य असल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अपात्र ठरविले आहे.

       मेहताब नाईक यांनी चंदगड नगरपंचायतीची निवडणुक वार्ड क्र. ५ मधून लढवून त्यामध्ये ते विजयी झाले होते. त्यावेळी त्यांना दोन अपत्ये होती. पण २०२२ मध्ये त्यांना तिसरे अपत्य झाल्याने या विरोधात सिकंदर मुस्ताक नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाद्वारे  १५/६/२०२२ रोजी तक्रार केली होती. पुराव्याच्या आधारे सिकंदर नाईक यांचा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १६ (१) (के) नुसार अर्ज मान्य करण्यात आला. नगरसेवक मेहताब आयुब नाईक (वार्ड क्र. ५) चंदगड नगरपंचायत यांना उर्वरित कालावधीसाठी अनर्ह (अपात्र) ठरविण्यात आले आहे. सिकंदर नाईक यांच्या वतीने ॲड. विजय कडुकर यांनी काम पाहीले.

No comments:

Post a Comment