पंढरीनाथ आंबेरकरला फाशीची शिक्षा द्या, चंदगड पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2023

पंढरीनाथ आंबेरकरला फाशीची शिक्षा द्या, चंदगड पत्रकार संघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने नायब तहसिलदार हेमंत कामत यांना निवेदन देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व सदस्य.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

        लोक भावनेनुसार रिफायनरी उद्योगाच्या विरोधात वार्तांकन केल्याबद्दल रत्नागिरी महानगरचे पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ रा. कळेशी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांना चारचाकी गाडी खाली चिरडून मारणाऱ्या नराधम, गुंड पंढरीनाथ आंबेरकर याला फाशीची शिक्षा द्या. आदी मागण्यांचे निवेदन आज चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. तहसीलदार कार्यालय येथे निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत यांनी निवेदन स्वीकारले. 

        यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत पाटील, सी. एल. न्यूज चॅनलचे संपादक संपत पाटील, सचिव चेतन शेरेगार, पत्रकार संजय पाटील, संजय कुट्रे, निंगाप्पा बोकडे, संतोष सुतार, उदयकुमार देशपांडे आदींची उपस्थिती होती. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. पत्रकारांवरील हल्ल्याचे खटले जलद गती न्यायालयात चालवून दोषींवर कठोर कारवाई करावी. आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment