मनोरुग्ण मुलग्याने वडीलांना संपवले, तर आईला ही केले गंभीर जखमी !, कोठे घडली घटना........ - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2023

मनोरुग्ण मुलग्याने वडीलांना संपवले, तर आईला ही केले गंभीर जखमी !, कोठे घडली घटना........

आजरा / सी. एल. वृतसेवा 

       धारधार शस्त्राने वार करुन मनोरुग्ण मुलाने वडिलांना संपवले तर आईला गंभीर जखमी केले. बहिरेवाडी (ता. आजरा) येथे हि घटना घडली. बहिरेवाडी येथील सचिन कृष्णा गोरुले या घटस्फोटीत मुलाने वडील  कृष्णा बाबू गोरुले (वय - ६ ५) व आई पारुबाई कृष्णा गोरुले (वय ६०) यांना धारदार खुरप्याने वार करून वडीलांचे जीवन संपवले तर मारहाण करून गंभीर जखमी केले. रात्री उशिरापर्यंत आजरा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते.

सचिन कृष्णा गोरुले (मुलगा)

          घटना स्थळावरून मिळालेली  माहिती अशी, कुष्णा गोरुले यांचे घर भैरवनाथ हायस्कूलच्या जवळ असून सचिन हा आई वडीला समवेत रहात होता. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याने आई - वडीलांशी वादा वाद सुरु केला.  घरी  असणाऱ्या खुरप्याने आई पारुबाईस मारण्यास सुरुवात केली असता त्या तावडीतून निसटून ओरडत बाहेर पडल्ल्याया. घराच्या बाहेर आल्या असता वडील कृष्णा गोरुले हे तावडीत सापडले. त्यांचेवर सचिनने खुरप्याने मानेवर, तोंडावर सपासप वार केले. जोराचा मार लागल्याने कृष्णा गो रुले हे रक्ताच्या थारोळ्यात  पडले.

कृष्णा बाबू गोरुले (वडील)

        पारुबाई यांचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घराकडे धाव घेतली असता वडील कृष्णा हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सचिन हा पुन्हा बाहेर येऊन दगा फटका करेल म्हणून ग्रामस्थांनी घराच्या बाहेरून कड्या लावून त्याला घरात बंद केले. आई पारुबाईला रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रूग्णांलय गडहिंग्लज येथे नेण्यात आले. 

      पोलिसांनी  घटनास्थळी भेट दिली असता घराच्या पाठीमागील दरवाजाला लाथ मारून दरवाजा उघडून  प्रवेश केला.  पोलिसांनी सचिनला  प्रसंगावधान राखून ताब्यात घेतले. अधिक तपास आजरा पोलिस करीत आहेत.

No comments:

Post a Comment