गंधर्वगड येथील चाळोबा देवाची रविवारी यात्रा व प्रवेशद्वार उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2023

गंधर्वगड येथील चाळोबा देवाची रविवारी यात्रा व प्रवेशद्वार उद्घाटन



चंदगड / प्रतिनिधी
गंधर्वगड (ता. चंदगड) येथील ८४खेंड्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री चाळोबा देवालयाची वार्षिक यात्रा व कोरजकर बंधुच्या सहकार्यातून साकारलेल्या चाळोबा मंदिर प्रवेशद्वार व  तटबंदीचे उद्घाटन रविवार दि . १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.या दिवसी सायंकाळी ६ वाजता विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तुळस पूजन यानंतर सायंकाळी ७ वाजता देवदेवतांचे धार्मिक विधी व आरती होणार आहे . रात्री १० वाजता ' गाव गुंडांचा विषारी विळखा ' या तीन अंकी तमाशाप्रधान नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.या नाटकाचे उद्घाटन सेवा संस्थेचे जेष्ठ संचालक मारुती लक्ष्मण ढोणुक्षे (केरवडे) यांच्या हस्ते आबाजी वाईंगडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.सोमवार दि . १३ रोजी पहाटे ४ वाजता जागरण गोंधळ व महाप्रसाद होणार आहे . सकाळी ४.३० वाजता पालखी सोहळा , सकाळी ८ वाजल्यापासून महाप्रसाद होणार आहे . सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा , असे आवाहन देवस्थान कमिटीमार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment