जेलुगडे येथे रविवारी "व्यंकोजी वाघ"नाट्यप्रयोगाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2023

जेलुगडे येथे रविवारी "व्यंकोजी वाघ"नाट्यप्रयोगाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
जेलुगडे (ता. चंदगड) येथील श्री सातेरी भावई देवीची वार्षिक यात्रा रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी होत आहे.या निमित्त्य रात्री ११.वाजता कमलाकर बोरकर लिखित व एल आर गावडे दिग्दर्शीत तीन अंकी ऐतिहासिक नाटक 'व्यंकोजी वाघ' या
नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.या नाटकाचे उद्घाटन ॲड. नामदेव नारायण गावडे यांच्या हस्ते अशोक नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.३५ वर्षांपूर्वी हाच नाट्यप्रयोग जेलुगडे गावातील हौशी कलाकारांनी सादर केला होता.त्या वेळेच्या सर्व कलाकारांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.या नाटकाचा लाभ नाट्यरसिकानी घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीमार्फत करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment