कल्लाप्पा पाटील यांच्या 'सुडाग्नी' कादंबरीचे आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2023

कल्लाप्पा पाटील यांच्या 'सुडाग्नी' कादंबरीचे आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते प्रकाशन

 

'सुडाग्नी' कादंबरीचे प्रकाशन बेळगाव येथे आप्पासाहेब खोत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित कल्लाप्पा पाटील.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा     
      कालकुंद्री (ता. चंदगड) चे सुपुत्र, प्राथमिक शिक्षक कल्लाप्पा जोतिबा पाटील यांच्या 'सुडाग्नी' या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ कथाकार आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते मराठा मंदिर, बेळगाव येथे झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव मार्फत हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
     संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे होत्या. संमेलनाचे उद्घाटन अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वागताध्यक्ष  ॲड सुधीर चव्हाण, अ. भा. म. सा. परिषद बेळगावचे राज्याध्यक्ष रवींद्र पाटील, कवी रमजान मुल्ला, अनिल दीक्षित आदींची उपस्थिती होती. कल्लाप्पा पाटील यांचे यापूर्वी लचका, तलप, आघात व झुंज हे चार कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. सुडाग्नी कादंबरीस प्रकाशनापूर्वीच  करवीर साहित्य परिषद कोल्हापूर यांचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

No comments:

Post a Comment