उत्साळी येथे काजू बागेला आग, जवळपास ५० हजारांचे नुकसान - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2023

उत्साळी येथे काजू बागेला आग, जवळपास ५० हजारांचे नुकसान

 

आगीमध्ये जळालेली काजूची झाडे.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      उत्साळी (ता. चंदगड) येथील संतोष वसंतराव सावंत भोसले यांच्या शिरोली हद्दीतील 290 गट नंबर, मधील काजू बागेला सोमवारी दिनांक ६ रोजी दुपारी १.३० मिनिटांनी आग लागल्याची माहीती जमीन करणारे रयत धोंडीबा घोळसे यांच्या मुलाने गुरुनाथ घोळसे यांनी माहिती दिली. याबाबत चंदगड पोलिसात सावंत भोसले यांनी तक्रार दिली आहे. 

    याबाबत पोलीसात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, शिरोली  हद्दीतील २९० गट नंबर मधील शेतजमीन ही संतोष सावंत भोसले यांनी धोंडीबा घोळसे अलबादेवी यांना करण्यासाठी दिली आहे. यापूर्वी गोपाळ बाबुराव देसाई, विठोबा बाबुराव देसाई यांना करण्यासाठी दिली होती. त्यांनी अपरोक्ष सातबारा पत्रकी पोकळकूळ लावून घेतले. हे निदर्शनास आल्यानंतर त्यांना तेथून हटवण्यात आले. त्यानंतर ती जमीन सावंत भोसले व अलबादेवीतील घोळसे हे करत आहेत. सातबारा पत्रकावरील पोकळ कुळ कमी करण्यासाठी तहसीलदार व प्रांत कोर्टात दावा दाखल केला आहे. तरी याचा राग मनात धरून गोपाळ बाबुराव देसाई, विठोबा बाबुराव देसाई, बाबुराव विठोबा देसाई, शेवंता गोपाळ देसाई यांनी ही आग लावण्याचा संशय मनात घेऊन संतोष सावंत-भोसले यांनी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. शेत जमिनीमध्ये काजू, आंबा व मेसकाटी बेट आहे. याला आग लागल्याने जवळपास पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अशी फिर्याद संतोष सावंत-भोसले यांनी चंदगड पोलीसात दिली आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे. 

No comments:

Post a Comment