![]() |
डॉ. एस. डी. गोरल |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक आणि वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. एस. डी. गोरल यांची शिवाजी विद्यापीठ वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेच्या व्यवस्थापन अभ्यास मंडळावर नियुक्ती झाली. कुलगुरूंनी केलेल्या सदस्य निवडीचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले आहे.
डॉ. गोरल यांनी मागील ५ वर्षांत शिवाजी विद्यापीठ वाणिज्य अभ्यास मंडळ व Faculty सदस्य म्हणून काम केले. ते पी. एचडी. मार्गदर्शक आहेत. त्यानी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात व परिषदेत सहभाग घेवून १०० हून अधिक शोधनिबंध सादर केले आहेत. तर ४० शोधनिबंध प्रकाशित झालेत. खेडूत शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी डॉ. गोरल यांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले. या प्रसंगी महाविद्यालयाचा सर्व शिक्षक व प्रशासकीय वृंद उपस्थित होता.
No comments:
Post a Comment