वातावरणात उष्णतेच्या झळा जाणवू लागल्याने चंदगड तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोमजाळ - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2023

वातावरणात उष्णतेच्या झळा जाणवू लागल्याने चंदगड तालुक्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोमजाळ


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

  सध्या मार्च महिण्यातच उष्णतेच्या झळा जाणवू लागत्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. उष्माघात सारख्या संकट पासून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन चंदगड तालूका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ  यांनी केले आहे.

डॉ. सोमजाळ यांनी पुढील प्रमाणे नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

                       काळजी कशी घ्यावी?

१) हलक्या वजनाचे फिकट रंगाची सैल कॉटनची कपडे घालावे.

२) दुपारी बारा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शक्यतो बाहेर जाणे टाळा. बाहेर जाणे गरजेचे असल्यास गॉगल, छत्री किंवा टोपी वापरा, टोपीच्या आतील बाजूस एक ओले कापड ठेवावे.

३) शेतात काम करणाऱ्या कष्टकरी लोकांनी दुपारच्या वेळेस झाडाखाली थोडीशी विश्रांती घ्यायला हवी.

४) स्त्रियांनी स्वयंपाक सकाळी दहाच्या अगोदर व सायंकाळी पाच नंतर करावा. दुपारी स्वयंपाक करणे टाळावे.

५) दिवसभर तहान लागेल तसे भरपूर पाणी प्यावे व घराबाहेर पडताना नेहमी पाणी आपल्या सोबत ठेवावे, लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी इत्यादी पिण्यास प्राधान्य द्यावे.

६) फळे भाजीपाला खावे. शक्यतो करून मटन मासे तळलेले पदार्थ व तिखट पदार्थ टाळावेत.

७) ओलसर पडदे, पंखा इत्यादीच्या मदतीने घर थंड ठेवावे.

८) चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स व मद्यपान शक्यतो करून टाळावे.

९) लहान मुलांची काळजी घ्यावी व त्यांना वारंवार पाणी पिण्यास सांगावे.

                           उष्माघाताची लक्षणे

     कातडी लालसर होणे, ताप येणे, डोकेदुखी, हाता पायात गोळे येणे, थकवा जाणवणे, पोटात मुरडा मारणे, खूप घाम येणे, चक्कर येणे व उलटी होणे, शुद्ध हरपणे इत्यादी.

                                 प्रथमोपचार 

       ओल्या थंड फडक्याने अंग पुसून घेणे किंवा साधा साबन वापरुन आंघोळ करावी, रुग्णांला सावलीत आणि थंड जागी हलविणे, अंगावरील कपडे सैल करा, दुखणाऱ्या स्नायूस हलका मसाज देणे, थोडे थोडे पाणी पिण्यास देणे.

       प्रथमोपचार झाल्यानंतर रुग्णांस त्वरित जवळच्या शासकीय रुग्णांलयात पुढील उपचारासाठी पाठविणे. अशा प्रकारचे आवाहन डॉ. बी. डी. सोमजाळ तालुका आरोग्य अधिकारी चंदगड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment