कोवाड परिसरात धूलीवंदन उत्साहात, मूलांनी लूटला बोंब मारण्याचा आनंद - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2023

कोवाड परिसरात धूलीवंदन उत्साहात, मूलांनी लूटला बोंब मारण्याचा आनंद


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         भारतीयांचा पारंपारीक सण धूलिवंदन व होळी कोवाड (ता. चंदगड) परिसरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रंग, धूळ, पाण्याच्या उधळणी बरोबरच बोंब मारण्याचा आनंदही सर्व अबाल वृद्धानी घेतला. चंदगड तालुक्यात आजच्या दिवशी धुळलीवंदन होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची प्रथा आहे. 

     काल पासूनच होळीची व धूली वंदनाची जय्यत तयारी करण्यात आली होती. आज सकाळी सात पासूनच धूलीवंदनाला सुरवात झाली. ठिकठीकाणी गाणी लावून नाचून आनंद व्यक्त करण्यात आला. रंगाच्या उधळणी बरोबरच बोंब मारण्याचा आनंदही सर्वांनी लूटला. तर कोवाड येथे बालकांनी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन धारकांना अडवून पैशांची मागणी केली. या प्रकाराची वाहन धारकाकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment