मुंबई येथे रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू, धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला लकीकट्टे गावावर शोककळा - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2023

मुंबई येथे रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू, धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला लकीकट्टे गावावर शोककळा

राहुल सुरेश थोरवत

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

लकीकट्टे (ता. चंदगड) येथील राहुल सुरेश थोरवत (वय ३५) या तरुणाचा रेल्वेमध्ये चढताना हात सुटून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाला.

धुलीवंदनाच्या पूर्वसंध्येला  सोमवारी  दि. ६ रोजी रात्री ९ वाजता  झालेल्या या दुर्घटनेने लकीकट्टे गावावर शोककळा पसरली असून या  घटनेची नोंद  कांदिवली रेल्वे पोलीस स्टेशनला झाली आहे. त्याच्यावर मंगळवारी दि. ७ रोजी मध्यरात्री लकीकट्टे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटना सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान झाली. 

    सदर घटना कांदिवली गोरेगाव जवळ लोकल ट्रेन, सेंट्रल लाईनच्या राम मंदिर रेल्वे स्टेशनला ही घटना घडली. सामाजिक कार्यात राहुलला नेहमी अग्रेसर असायचा त्याच्या मृत्यूने गावावर शोक कळा पसरली आहे. 

त्याच्या  पश्चात पत्नी, आई, दोन बहिणी, भाऊजी असा परिवार आहे. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला आहे.  लकीकट्टेतील माजी उपसरपंच विलास रेडेकर यांचे ते जावई  तर विलास थोरवत यांचे ते चुलत पुतणे होय.No comments:

Post a Comment