'माधवबाग क्लिनिक' हरिमंदीर बेळगाव येथे गुरुवारी होणाऱ्या शिबिरात ६४ प्रकारच्या रक्त तपासण्या - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2023

'माधवबाग क्लिनिक' हरिमंदीर बेळगाव येथे गुरुवारी होणाऱ्या शिबिरात ६४ प्रकारच्या रक्त तपासण्या


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    सुदृढ व निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे. आपण निरोगी राहण्यासाठी आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होणारच नाही यासाठी जागरूक असले पाहिजे. सर्व वयोगटातील व्यक्तींना अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होऊ शकतात. हे टाळण्यासाठी वेळोवेळी रक्त तपासणी गरजेची आहे. अशा तपासणीबाबत माधवबाग क्लिनिक कडे रुग्ण, नातेवाईक तसेच निरोगी व्यक्तींकडून नेहमी विचारणा व मागणी होत होती. याचा विचार करून माधवबाग क्लिनिक हरी मंदिर बेळगाव यांनी गुरुवार दि. ९  मार्च २०२३ रोजी सकाळी ८ ते ११ पर्यंत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात ६४ प्रकारे रक्ताच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. 

         या तपासणीदवारे मधुमेह, रक्तदाब, किडनिचे आजार, थॉयरॉईड thyroid ग्रंथींचे आजार, लिवर liver चे विकार, कोलेस्ट्रॉल cholesterol, ॲनिमिया anaemia, हृदयरोग, paralysis  आदी अनेक संभाव्य आजारांचे निदान वेळेपूर्वी होते. तपासणीला येताना बारा तास उपाशीपोटी राहणे गरजेचे आहे.  ( आज रात्री ८ ते सकाळी ८ रक्त तपासणी पर्यंत काहीही खाऊ- पिऊ नये). या ६४ तपासण्यांसाठी सर्वसाधारण खर्च रुपये ७१००/- येतो. तथापि शिबिर अंतर्गत केवळ १६००/- रुपयात या तपासण्या केल्या जाणार आहेत. याशिवाय डॉक्टरांचा सल्ला व समुपदेशन पूर्णपणे मोफत आहे.  तरी सर्व वयोगटातील रुग्ण व निरोगी व्यक्तींनीही याचा लाभ घ्यावा असे आवाहन माधवबाग क्लिनिक हरी मंदिर बेळगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.


बुकिंग करण्यासाठी संपर्क पत्ता व फोन नंबर

हरिमंदीर बेळगाव क्लिनिक

       वास्तूश्री रेसीडेंसी, हरिमंदीर  जवळ, गाडगीळ स्टॉप, मेन रोड अनगोळ - बेळगाव 590006. मोबाईल नंबर - 8770684156 / 9591563631.

No comments:

Post a Comment