निरामय आरोग्यासाठी भरड धान्यांचा आहारात समावेश आवश्यक - डॉ. माधवी पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2023

निरामय आरोग्यासाठी भरड धान्यांचा आहारात समावेश आवश्यक - डॉ. माधवी पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा  

          हजारो वर्षांपूर्वीपासून आपल्या पूर्वजांच्या आहारात भरड धान्ये वापरली जात होती. भर डधान्यांचे पौष्टिक मूल्य महत्त्वाचे आहे. त्यातूनच शरीरास आवश्यक कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, तंतुमय पदार्थ, खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात. शर्करेचे प्रमाण कमी असल्याने रक्तशर्करा नियंत्रित राहते. प्रतिकारशक्ती व पचनक्रिया ही सुधारते. शिवाय ही भरडधान्ये कमी पाण्यावर कोरडवाहू शेतीत अल्प उत्पादन खर्चात घेता येतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेत मोलाची मदत होते . संयुक्त राष्ट्र संघटनेने भारताच्या पुढाकाराने हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे भरडधान्यांचे आहारातील महत्त्वपूर्ण स्थान अधोरेखित झाले आहे. असे प्रतिपादन डॉ. माधुरी पाटील यांनी केले. त्या र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील ताराराणी सखी मंचने आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमात बोलत होत्या. 

     अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य पी. आर. पाटील यांनी महिला हक्कासाठी जागरूक होत आहेत व स्वकर्तृत्वाच्या बळावर स्वतःला सिद्ध करीत आहेत ही समाधानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी ज्योती यादव, मयुरी कांड र समृद्धी पाटील, कोमल अनगुडे यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक ताराराणी सखी मंचच्या समन्वयक प्रा. सौ. एस. बी. दिवेकर यांनी केले तर सूत्रसंचालन दिव्या फाटक हिने केले. पूजा देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास एस. एस. कोळी, करुणा चंदगडकर, अंकिता खराडे, प्रियांका निटुरकर हांडे डॉ. एन. एस. मासाळ, डॉ. डी. ए. मोरे, एस. व्ही. कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment