माध्यमिक शिक्षकांचे बीएलओ आदेश रद्द करण्यासाठी तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2023

माध्यमिक शिक्षकांचे बीएलओ आदेश रद्द करण्यासाठी तहसिलदारांना निवेदन

चंदगड तालूका माध्यमिक शिक्षक संघटनेकडून बीएलओ आदेश रद्द करण्यासंदर्भात तहसिलदार विनोद रणवरे याना निवेदन देण्यात आले.

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           माध्यमिक शिक्षकांना मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) चे आदेश शासनाकडून देण्यात आल्याने ते रद्द करण्यासंदर्भातील निवेदन चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे याना चंदगड तालूका माध्यमिक शिक्षक संघटना व माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांचेकडून आज देण्यात आले.

     ऐन परिक्षेच्या धामधूमीत माध्यमिक शिक्षकांना मतदान केद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) चे आदेश शासन काढण्यात आल्याने माध्यमिक शिक्षकाकडून संतापाची लाट उसळली आहे.  

       माध्यमिक विभागाकडील शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामांना सामोरे जावे लागत आहे. प्राथमिक विभागाकडील सांस्कृतिक स्पर्धांना परीक्षक, क्रीडा स्पर्धाना पंच अशी कामे करावी लागत आहेत. अशातच इ. ५ वी शिष्यवृत्ती व इ. ८ वी शिष्यवृत्ती, एन एन एम एस परीक्षांचे पर्यवेक्षक व ज्यादा तास, १० वी १२ वी बोर्ड परिक्षा व पेपर तपासणी, विज्ञान प्रदर्शन, शालेय क्रीडा स्पर्धा याच बरोबर दररोजचे वर्गातील शालेय अध्यापन करावे लागते. परीक्षेनंतर  पेपर तपासणीचे काम शिक्षकांना करावे लागणार आहे. काही ज्येष्ठ शिक्षकांना मॉडरेटर म्हणून ऑर्डर आल्या आहेत. एका बाजूने समाजात शिक्षकांकडून चांगल्या निकालाची अपेक्षा ठेवली जात आहे. या अशैक्षणिक कामांमुळे  दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. 

         या सगळ्या कामामधून B. L. O. कामकाजासाठी वेळ मिळणे अशक्य आहे. यातच काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या काही शिक्षकांनाही असे आदेश काढण्यात आले आहेत. त्यामूळे याचा विचार करून माध्यमिक  शिक्षकांची BLO ची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) चे आदेश रद्द करण्यासंदर्भात संबधीत निवेदन आज चंदगडचे तहसिलदार यांचेकडे चंदगड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघ चंदगड व चंदगड तालुका माध्यमिक शिक्षक संघ याच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी एम. बी. पाटील, व्ही. के. मोहिते, एस. डी. पाटील, एन. जी. लांडे, सौ. गावित 'बी. बी. नाईक' श्री. कानूरकर, श्री. सुतार यांच्यासह माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment