पत्रकार ऑफिसर्स व सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३, शनिवारपासून सुपर ८, सेमी फायनल व फायनलचे सामने रंगतदार व चुरशीचे होणार... - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2023

पत्रकार ऑफिसर्स व सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३, शनिवारपासून सुपर ८, सेमी फायनल व फायनलचे सामने रंगतदार व चुरशीचे होणार...

 

दोन्ही संघातील नाणेफेक 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि) आयोजित "पत्रकार, ऑफिसर्स, सोशल वर्कर्स क्रिकेट लीग २०२३" स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या शनिवार दि. ४ मार्च रोजी सुपरएट मध्ये पोहोचलेल्या आठ बलाढ्य संघामध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी महासंग्राम रंगणार आहे. उद्या होणारे सामने आरोग्य विभाग विरुद्ध प्राथमिक शिक्षक, तहसील कार्यालय विरुद्ध महावितरण, चंदगड पोलीस विरुद्ध चंदगड वन विभाग, खेडूत स्पोर्ट्स विरुद्ध एलआयसी इंडिया यांच्यात रंगणार आहेत. तर रविवार ५ मार्च रोजी सेमी फायनल व फायनल असे १०-१० षटकांचे सामने पार पडणार आहेत.

            याच दिवशी अंतिम सामन्यानंतर विजेता, उपविजेता संघास भव्य चषक तर विजेत्या संघास 'दक्ष कलेक्शन फिरता चषक' प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेत तालुक्यातील शासकीय, निमशासकीय, सहकार क्षेत्रातील कार्यालये अशा २४ संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. स्पर्धेत सहभागी सर्व संघातील सर्व खेळाडूंना चंदगड पत्रकार संघामार्फत मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देण्यात येणार आहेत. 

     त्यामुळे रविवार ५/३/२०२३ रोजी सेमी फायनल, फायनल मध्ये खेळणाऱ्या संघाव्यतिरिक्त स्पर्धेत सहभागी सर्व २४ संघातील खेळाडूंनी उपस्थित रहावे. असे आवाहन चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. उद्यापासून होणारे सर्व सामने हे हिंडाल्को मैदानावरच खेळवण्यात येतील याची सर्व खेळाडू व क्रिकेट शौकिनांनी नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment