कुदनुर येथे गुरुवारी कुस्ती मैदान - चंदगड लाईव्ह न्युज

03 April 2023

कुदनुर येथे गुरुवारी कुस्ती मैदान

 


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथे हनुमान जयंती निमित्त गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. सालाबाद प्रमाणे होणाऱ्या या मैदानात जोड पाहून कुस्त्या लावल्या जाणार आहेत. विजेत्या पैलवानांना रोख बक्षीस दिली जाणार असून याचा लाभ महाराष्ट्र, कर्नाटक सह अन्य राज्यातील पैलवान तसेच कुस्ती शौकिनांनी घ्यावा, असे आवाहन तालीम मंडळ, ग्रामपंचायत व कुदनूर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment