करिअर स्पेक्ट्रम आयोजित विक्रांत निबंध स्पर्धेची सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2023

करिअर स्पेक्ट्रम आयोजित विक्रांत निबंध स्पर्धेची सुरुवातचंदगड : सी. एल. वृत्तसेवा 
चंदगड मधील इंजिनियर कै. विक्रांत राजाराम बांदिवडेकर यांच्या स्मरणार्थ करियर स्पेक्ट्रम आयोजित विक्रांत निबंध स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. व्ही. आर. बांदिवडेकर, प्रमुख वक्त्या सुप्रसिद्ध मराठी लेखिका माधुरी शानभाग या होत्या. प्रास्ताविक अॅड. विजय कडूकर यांनी केले. चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे आणि चंदगडच्या नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मुलांना विद्यार्थी दशेपासून योग्य मार्गदर्शन व दिशा मिळाली तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. मुलांना बोलतं करण्याबरोबरच लिहीतं करणे गरजेचे आहे. मांडलेल्या विषयाबद्दल सांगोपांग माहिती घेवून, त्याचे संकलन करुन आपल्या शब्दात.. आपल्या भाषेत ते सर्वांसमोर मांडणे. यासाठी निबंध लेखन तसेच वक्तृत्व जरुरीचे आहे. यातुनच आपल्या व्यक्तीमत्वाची योग्य पद्धतीने मशागत होऊन जाते. आपले विचार योग्यरितीने मांडणे हे विद्यार्थीदशेपासूनच जमले पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर निबंध आणि वक्तृत्व यामुळे नक्कीच मदत होते. निबंध प्रकार विचाराला चालना देणारे आहेत. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका यांनी केले. 
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित प्राचार्य पी. आर. पाटील, अॅड. आर. पी. बांदिवडेकर, प्राचार्य एन. डी. देवळे, डॉ. एस. पी. बांदिवडेकर, एस. आर. देशमुख, संजय पाटील, प्रा. कविता बांदिवडेकर, प्रा. साळुंखे, प्रविण नेसरीकर, अवधुत जोशी, काजिर्णे-म्हाळुंगे गांवचे सरपंच विठोबा गावडे, कमलाकर सावंत, रविंद्र पाटील, महेश पिळणकर, महेश निट्टूरकर, महेश माने, मोहन डोणकर इतर मित्र परिवार, तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विक्रांत निबंध स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. यात जास्तीत जास्त विद्यार्थी वर्गाने सहभागी व्हावे असे आवाहन चंदगडचे तहसिलदार  विनोद रणवरे साहेबांनी या प्रसंगी केले.
मधुबन बझार चंदगड, अरविंद बुक हाऊस बेंगलोर, वन स्पोर्टस् पुणे तसेच सुपर क्लासमेंट ग्रुप यांच्या संयुक्त सहकार्याने घेण्यात येणाऱ्या या स्पर्धांमध्ये देशातील कोणत्याही राज्यातील ७ वी ते १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषेमधून वैयक्तीक ५-५ अशी एकूण १५ बक्षिसे, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला ई प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच ज्या शाळांमधून जास्त विजयी क्रमांकाचे विद्यार्थी असतील त्या पहिल्या तीन क्रमांकाच्या शाळांनाही सन्मानचिन्ह (ट्रॉफी) देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचा कालावधी ३० मार्च पासून सुरु झाला असून ३० जुन अळेर आपले निबंध वरील ३ भाषेमध्ये सुयोग्य मांडणीत, सुवाच्च हस्ताक्षरात लिहून आपल्या शाळेचा शिक्का घेवून support@career spectrum.com यावर पाठवायचे आहेत. (बक्षिस रक्कम अनुक्रमे १) ५००१/-, २) ३००१/-, ३) २००१/-, ४) १५०१/-, ५) १००१/- अशी तीनही भाषेतून वेगवेगळी दिली जातील.)


No comments:

Post a Comment