मुगळी येथील सेवासंस्थेत रवळनाथ शेतकरी आघाडीची सत्ता, सत्ताधाऱ्यांचे पानिपत - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2023

मुगळी येथील सेवासंस्थेत रवळनाथ शेतकरी आघाडीची सत्ता, सत्ताधाऱ्यांचे पानिपत

 

  मुगळी (ता.चंदगड) येथील रवळनाथ सेवासंथेच्या निवडणूकीत विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देताना सहाय्यक निबंधक सौ. काटकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       मुगळी (ता. चंदगड) येथील श्री रवळनाथ विविध कार्यकारी सह. सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत श्री.रवळनाथ शेतकरी ग्रामविकास पॅनेलने १२ पैकी १० जागा जिंकत परिवर्तन केले. सत्ताधारी पॅनेलला बिनविरोध १ व कर्जदार गटातून २ जागेवर समाधान मानावे लागले.   

    निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून उत्तम पाटील (पोरेवाडी) यांनी सत्ताधारी गटासोबत बसून बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. पण तडजोडीत एकमत न झाल्यामुळे अखेर निवडणूक लागली. सोमवार (दि.३ एप्रिल रोजी) सकाळी ८ ते ४ या वेळेत मुगळी येथील विद्यामंदिर मुगळी येथे अत्यंत चुरशीने मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक  सौ.काटकर यांनी काम पाहिले. १९९ पैकी १९१ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी ४ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. 

      रवळनाथ शेतकरी ग्रामविकास पँनेलच्या बाजूने कौल मिळताच उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.या वेळी आघाडीचे वैजू नुलकर,अर्जुन रेडेकर, दत्तू मळेकर, कुस्तास कुतिन्हो, वैजू पाटील, गुंडू चव्हाण,अर्जुन मळेकर, संजय शिंदे, गौरोजी निचम, अर्जुन म.रेडेकर,अनिल पाटील, संदीप रेडेकर,यांनी नेतृत्व केले.विजयी उमेदवार पुढील प्रमाणे सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटातून पाडुरंग कृष्णा रेडेकर, गोविंद लक्ष्मण कलागते, दत्तू राणबा कलागते, परसराम बाबू चव्हाण, विठ्ठल तुळशीराम पाटील, नारायण बापू रेडेकर, भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून मारुती यशवंत पाटील इतर मागास प्रवर्ग गटातून कानोबा गोपाळ शिवनगेकर महिला राखीव गटातून - रेडेकर कल्पना मोहन रेडेकर, आनंदी दत्तू मळेकर हे उमेदवार विजयी झाले तर सत्ताधारी आघाडीचे बाबू बाळू रेडेकर, जयवंत मलाप्पा पाटील, यल्लापा धोंडिबा कांबळे (बिनविरोध) हे उमेदवार विजयी झाले.

No comments:

Post a Comment