डाॅ. शिल्पा शिंदे |
तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील नवजीवन हाॅस्पिटलच्या डाॅ. शिल्पा विनायक शिंदे या राजीव गांधी विद्यापीठ बेंगलोर येथून एमडी मेडिसीन परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. त्यांना डाॅ. धिरज पाटील, डाॅ. सुधीर कोळी यांचे मार्गदर्शन लाभले तर कृष्णा मेडिकल कॉलेज संकेश्वरचे अध्यक्ष डाॅ. संतोष खज्जनावर, संत गजानन महाराज मेडिकल काॅलेज महागावच्या प्राचार्या डाॅ. मंगल मोरबाळे, डाॅ. विनायक शिंदे, चंद्रकांत शिंदे, चित्रा शिंदे, डाॅ. सारिका पाटील यांचे विशेष प्रोत्साहन लाभले. डाॅ. शिंदे यांचे यशाबद्दल नेसरी परिसरातून कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment