पारगड येथे डॉ आंबेडकर जयंती उत्साहात साजरी - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2023

पारगड येथे डॉ आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

पारगड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीवेळी उपस्थित मान्यवर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

       किल्ले पारगडच्या पायथ्याशी आंबेडकर नगरात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उ्साहात साजरी झाली.  ग्रुप ग्रामपंचायत सरपंच संतोष पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक संतोष तांबडे, आशा सेविका निशा डांगे, अंगणवाडी सेविका निधी जांभळे, सामाजिक कार्यकर्ते रघुवीर शेलार, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग कांबळे, यशवंत कांबळे, राजाराम कांबळे, कृष्णा कांबळे, हरी कांबळे उपस्थित होते. मान्यवर व शालेय विद्यार्थ्यांच्या भाषणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.  

         मंडळाचे अध्यक्ष मोहन कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की  गेली ३५ वर्षे आम्ही कुणाच्यातरी अंगणात किंवा रस्त्यावर जयंती साजरी करतोय. समाज मंदिर मंजूर होते पण जागा वनविभागाचा ताब्यात  आहे. त्यांच्या अडमोटेपणामुळे बांधकामासाठी परवानगी मिळत नाही. ही शासनाची नामुष्की आहे. वन विभागाने या प्रश्न तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व सरपंच संतोष पवार यांनी या प्रश्नी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले. संदिप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. रवी कांबळे यांनी आभार मानले. यावेळी योगेश कांबळे, साईप्रसाद कांबळे, संजय कांबळे, विश्राम कांबळे, राजेश कांबळे, गोविंद कांबळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment