शिक्षक समितीमार्फत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव, १२८ गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2023

शिक्षक समितीमार्फत गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव, १२८ गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

       चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने कारवे ता.चंदगड येथील विरंगुळा केंद्रात इयत्ता चौथी, पाचवी, सातवी व आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक अशा तब्बल १२८ गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनाजी कृष्णा पाटील  होते. शिक्षक पतसंस्थेचे नूतन अध्यक्ष गोविंद लक्ष्मण चांदेकर,उपाध्यक्ष शितल कुरणे, शाखाध्यक्ष गंगाराम वेसणे व गणपत लोहार  यांच्यासह नवनिर्वाचित १५ संचालकांचा सत्कार  सरचिटणीस एन. व्ही. पाटील, शिक्षक नेते सुभाष चौगुले, माजी अध्यक्ष शिवाजी बिरजे, विजय कांबळे शिक्षक बँक संचालक बाबुराव परीट व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. प्रारंंभी प्रास्ताविक सतीश माने यांनी करून या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. अध्यक्ष धनाजी पाटील यानी शिक्षक समितीने आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्यांचा आढावा घेतला. शिक्षक समितीने आजतागायत  अनेक शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव केला आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून महापूर काळात आपल्या तालुक्यातील घरांची पडझड झालेल्या २३ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपये याप्रमाणे २ लाख तीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. याचबरोबर कोरोनाची महामारी चालू असताना  जनरेटर, ऑक्सिजन जनरेटर मशीन इंजेक्शन  याचबरोबर जिल्हा शाखेसाठी ॲम्बुलन्स साठी आर्थिक मदत अशा पद्धतीने तब्बल दोन लाख ३५ हजार रुपयांची मदत  केली आहे. याचबरोबर बांद्राई दुर्घटना सारख्या दुर्घटना एखाद्या व्यक्तीवर आलेले संकट अशा वेळेस सुद्धा शिक्षक समितीने भरघोस अशी ९० हजाराची मदत केलेली आहे. शिक्षक समितीच्या दरवर्षीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वच्या सर्व धनगरवाडे व दुर्गम भागातील शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाचे कार्य सुद्धा शिक्षक समितीने केल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. 

         यावेळी शिक्षक समितीचे सरचिटणीस एन. व्ही. पाटील, माजी अध्यक्ष विश्वनाथ गावडे, शिक्षक बँक संचालक बाबुराव परीट व गोविंद चांदेकर यांनी आपली मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यानी आर्थिक मदत व नियोजनात सहभाग घेतला ते राज्य आदर्श शिक्षक शशिकांत सुतार, माजी अध्यक्ष विश्वनाथ गावडे, सतीश माने, महिला आघाडी अध्यक्षा मीना लोबो  व स्वाती भगत  यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आले. 

         सदर कार्यक्रमासाठी, समता शिक्षक परिषदेचे अध्यक्ष संतू कांबळे, पदवीधर संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील, सरचिटणीस विनायक प्रधान,dcps अध्यक्ष आंनद कांबळे, माजी अध्यक्ष पाटकर, बळवंत लोंढे, राजू जोशी, मलिक शेख,दत्तात्रय भाटे, ज्योतिबा बामणे, राजाराम भोगण, शीतल पाटील, संगीता जळगेकर, स्नेहल वाघमारे, रियाज शेख, विठोबा मुंगूरकर,  जयवंत जाधव, दयानंद पाटील, माणिक मुंढे, विनायक गिरी, संतोष देवळी यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, पालक मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रशांत पाटील यांनी केले तर आभार जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील यांनी मानले.No comments:

Post a Comment