सी. ए. सौ. संज्योती पाटील-शिंदे यांना पी. एचडी प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2023

सी. ए. सौ. संज्योती पाटील-शिंदे यांना पी. एचडी प्रदान

सौ. संज्योती पाटील-शिंदे


चंदगड/ सी. एल. वृत्तसेवा

सी.ए.सौ. संज्योती योगेश पाटील-शिंदे यांना शिवाजी विद्यापिठाने पी. एचडी, प्रदान केली. त्यांनी 'टॅक्सेशन ऑफ क्रॉसबार्डर सर्विसेस' या विषयावर प्रबंध सादर केला. सौ. संज्योती या उद्योजक संजीव शिंदे यांची सुकन्या असून त्या कोल्हापूर येथील माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. पाटील (न्या.  पाटील  ह्यांचे  मूळ  गाव, होसूर ता. चंदगड  आहे.) यांच्या स्नुषा आहेत. त्यांना डॉक्टर सौ. शर्वरी कुलकर्णी, डॉ. मारुलकर व डॉ. ए. एम. गुरव व त्यांचे पती सी. ए. योगेश पाटील यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. त्या सध्या पुणे येथील के. पी. एम. जी. इंडिया या प्रतिष्ठीत संस्थेमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत.

No comments:

Post a Comment