चंदगड बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, तीन वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या मोरीची अद्याप दुरुस्तीच नाही,१५ किलोमीटर अंतरासाठी ५० किलोमीटर फेरा ग्रामस्थांची गैरसोय - चंदगड लाईव्ह न्युज

09 April 2023

चंदगड बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार, तीन वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या मोरीची अद्याप दुरुस्तीच नाही,१५ किलोमीटर अंतरासाठी ५० किलोमीटर फेरा ग्रामस्थांची गैरसोय

तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे केगदवाडी इसापूर चौकुळ मार्गे जोडणाऱ्या रस्त्यावर असलेली मोरी रस्ता वाहुन गेला याचे बांधकाम तीन वर्षे उलटली तरी चंदगड बांधकाम विभाग अपयशी ठरले आहे. (छाया -  तुळशीदास नाईक)

दोडामार्ग दि. ९: सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या ढिसाळ कारणामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकार अनेक मार्ग जवळच्या मार्गाने जोडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पारगड किल्ला ते इसापूर चौकुळ आंबोली जवळचा मार्ग याच मार्गावर सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे  केगदवाडी इसापूर येथे बांधलेली मोरी वाहुन जाऊन संपर्क तुटला या घटनेला आज तीन वर्षे झाली तरी चंदगड बांधकाम विभाग यांनी डोळेझाक केली. त्यामुळे आंधळ दळतय कुञ पीठ खातय अशी अवस्था झाली आहे. बांधकाम विभाग यांच्या या बेजबाबदारपणामुळे  पंधरा किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी पन्नास किलोमीटर फेरा मारावा लागत आहे. त्यामुळे मोठी गैरसोय सहा ते सात गावातील ग्रामस्थ यांची झाली आहे. 

       दोडामार्ग तालुक्यातील तळकट कुंभवडे चौकुळ मार्गे इसापूर केगदवाडी पारगड किल्ला तेरवण असा जवळचा मार्ग चंदगड , सावंतवाडी, बांधकाम विभाग यांच्या हद्दीतून जातो. तिलारीनगर हेरा फाटा येथून देखील मार्ग आहे. शिवाय मोर्ले ते पारगड किल्ला असा मार्ग आहे. चंदगड बांधकाम विभाग यांनी काही वर्षापूर्वी केगदवाडी इसापूर येथे लाखो रुपये खर्च करून एका नाल्यावर मोरी बांधली होती. त्यामुळे या मार्गावर खाजगी वाहने एस टी बसेस ये जा करत होते. 

     मोरी रस्ता वाहून गेला  त्यामुळे संपर्क तुटला गावातील काही मंडळी यांनी माती टाकून दुचाकी जाईल चालत जाता येईल अशी वाट केली गेली तीन वर्षे या मोरीचे बांधकाम करावे रस्ता पूर्ववत करावा अशी मागणी केली जात होती पण आजपर्यंत चंदगड बांधकाम विभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष केले आहे असा स्थानिकांचा आरोप आहे. 

      चौकुळ ईसापूर रस्त्याच्या  डांबरीकरणासाठी शासनाने करोडो रुपये खर्ची घातले. सिंधुदुर्ग व कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या हद्दीतल्या, पूर्वीच्या या पायवाटेचे  रस्त्यात रूपांतर करणारे रस्त्याचे जनक  बाबासाहेब कुपेकर हे आज हयात असते तर, किल्ले पारगड  व सभोवतालील पंचक्रोशीतील गावांचा पर्यटनातून विकास झाला असता.आंबोलीकडे येणाऱ्या पर्यटकांना किल्ले पारगड खुणावतो आहे, पण बांधकाम खात्याच्या निष्क्रिय अधिकार्‍यामुळे किल्ल्याची साद पर्यटकापर्यंत पोहोचतच नाही.

       किल्ले पारगड व सभोवतालचा परिसर निसर्गाने नटलेला आहे. येथील हवामान अल्हादायक आहे. ईसापूर हुन चंदगड मार्गे आंबोली- चौकुळ ला जायला जवळपास ६० किलोमीटरचा फेरा पडतो. ईसापूर ते चौकुळ अंतर १४ किलोमीटर आहे. रस्त्यावरील मोरी वाहून गेल्यामुळे सार्वजनिक बांधकाम खाते प्रवासी एस.टी बस  वाहतुकीसाठी (परवानगी) एन ओ सी देत नाही. त्यामुळे ईसापूर, नामखोल,पारगड तेरवण वाघोत्रे इत्यादी गावातील लोकांची फार गैरसोय होत आहे. पैशापायी पैसा व वेळ सुद्धा खर्च होतो. मायबाप सरकारने लक्ष घालून हा रस्ता बारमाही वाहतुकीसाठी खुला करावा. झोपी गेलेल्या बांधकाम विभाग यांनी तातडीने वाहुन गेलेली मोरी रस्ता काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे. 

No comments:

Post a Comment