गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द - सरपंच शिवाजी तुपारे, मजरे कारवे शाळेत पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2023

गावच्या विकासासाठी सदैव कटिबध्द - सरपंच शिवाजी तुपारे, मजरे कारवे शाळेत पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार कार्यक्रम

 

सरपंच शिवाजी तुपारे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करताना

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

     हा सत्कार माझा नसून गावचा आहे. गावाने दिलेल्या संधीमुळेच या पुरस्कारापर्यंत मला मारता आली. त्यामुळे मजरे कार्वे गावच्या ऋणात सदैव राहू तसेच यापुढील काळातही गावच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही सरपंच शिवाजी तुपारे यांनी दिली.‌ शिवडाव येथील सावित्रीबाई चाॅरिटेबल ट्रस्टने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल मराठी विद्या मंदिरमध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.‌ अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयश्री हारकारे होत्या. 

       सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. शिक्षिका सुजाता जळगेकर यांनी प्रास्ताविक केले. समिती शिक्षणतज्ञ निंगाप्पा बोकडे यांनी सरपंच तुपारे यांच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई चाॅरिटेबल ट्रस्टचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच शिवाजी तुपारे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला. पुरेसे शिक्षक नसल्याने शाळेत शैक्षणिक कार्यासाठी मदत केलेल्या तनुजा बोकडे, प्रतिभा केसरकर, स्वाती चिभडे, तनुजा पोपकर यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्षात विविध परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

     तसेच दोन्ही अंगणवाडीकडूनही सरपंच तुपारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी उपसभापती देवाप्पा बोकडे, हनुमान सेवा सोसायटीचे चेअरमन तानाजी गडकरी, उपसरपंच पांडुरंग बेनके, शालेय समिती उपाध्यक्ष विजय बिरजे, सदस्य शरद पाटील, ज्योती कांबळे,  रेखा पाटील, दिपाली बोकडे, प्रियांका शिंदे, मनिषा पाटील, लता परीट, सुरेखा कांबळे उपस्थित होते. शिक्षिका संगिता जळगेकर यांनी सूत्रसंचलन केले तर राधिका मालुसरे यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment