आंबेडकर जयंती निमित्त कालकुंद्रीत १२ रोजी कबड्डी तर १४ रोजी समूहगीत स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2023

आंबेडकर जयंती निमित्त कालकुंद्रीत १२ रोजी कबड्डी तर १४ रोजी समूहगीत स्पर्धा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती उत्सव निमित्त दि. १२ ते १५ एप्रिल रोजी भीमक्रांती सांस्कृतिक युवा मंच यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
 बुधवार दि. १२ रोजी ५५ (२ खेळाडू ५८ कि.) किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा होणार असून  विजेत्यांना अनुक्रमे रु. १० हजार, ७ हजार, ५ हजार, ३ हजार रोख व चषक तसेच वैयक्तिक बक्षिसे आहेत. शुक्रवार १४ रोजी दुपारी २ वाजता देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा असून विजेत्यांना अनुक्रमे ४ हजार, ३ हजार, २ हजार, १ हजार व सर्व क्रमांकांना चषक देण्यात येणार आहेत. दि. १३ रोजी रात्री ८ वाजता गाव मर्यादित होम मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या महिलांना अनुक्रमे पैठणी, बनारसी, कांजीवरम आदी साड्यांची बक्षीसे आहेत. बक्षीस वितरण व सत्कार समारंभ दि. १५ रोजी सायंकाळी ५ वाजता सरपंच छाया जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कॉन्ट्रॅक्टर विलास पाटील, काशिनाथ कांबळे, रामराव पाटील, संगीता घाटगे यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी प्रा विनोदकुमार पाटील यांचे व्याख्यान तर रात्री ९.०० वाजता स्वरांगण म्युझिशियन हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. खेळाडू तसेच क्रीडा व संगीतप्रेमी रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment