महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शनिवारी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2023

महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शनिवारी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धामहागाव /सी. एल. वृत्तसेवा

संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये नवप्रवर्त २०२३ हा राष्ट्रीय स्तरावरील, टेक्नोडॉक, पेपर प्रेजेन्टेशन, कोडवाॅर व प्रोजेक्ट कॉम्पिटिशन स्पर्धा शनिवार दि. 15 एप्रिल रोजी होणार आहेत. 
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य व अद्ययावत ज्ञान अवगत व्हावे व या माध्यमातून नवीन उद्योजक निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळावी यास्तव विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. प्रत्येकवर्षी या स्पर्धा महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात येतात. महाराष्ट्रासह, कर्नाटक व इतर शहरातून या स्पर्धेत विद्यार्थी सहभागी होतात.
विजेत्या विद्यार्थ्यांना एकूण 21 हजार रुपयेपेक्षा अधिक रोख रक्कम बक्षिसे म्हणून, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सावंत यांनी दिली या स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा. सिद्धगोंडा जबडे व प्रा.श्रीकांत गुरव हे काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment