आसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सुनिता नांगरे व अनिता नाईक यांना अहील्याबाई होळकर पुरस्कार प्रदान - चंदगड लाईव्ह न्युज

02 June 2023

आसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सुनिता नांगरे व अनिता नाईक यांना अहील्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

 


आसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सुनिता नांगरे व अनिता नाईक यांना अहील्याबाई होळकर पुरस्कार देण्यात आला.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे ग्रामपंचायत स्तरीय  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याअंतर्गत आसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी सेविका सौ.सुनिता विजय नांगरे अंगणवाडी क्रमांक (६०) व अनिता अशोक नाईक अंगणवाडी क्रमांक (४ ) यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यांनी केलेल्या सामजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. ग्रामपंचायतीच्या  सरपंच शोभा दत्तू नाईक व उपसरपंच सौ.रुपाली रामजी गावडे  यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उत्तम प्रशासक, समाजसुधारक आणि युग प्रवर्तक अशा पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्कारामुळे आपली सामाजिक जबाबदारी वाढल्याची भावना व्यक्त केली.यावेळी ग्रामसेवक रवी पाटील यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका,ग्रामस्थ, महिला व उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment