अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, चंदगड ब्लॅक पँथरची निवेदनातून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2023

अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, चंदगड ब्लॅक पँथरची निवेदनातून मागणी

ब्लॅक पँथर च्यावतीने नायब तहसिलदार हेमंत कामत याना निवेदन देतान सुभाष देसाई, प्रा. दिपक कांबळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

      भीमजयंती निमित्त गावातून मिरवणूक काढलेने बोढार हवेली (ता. जि. नांदेड) येथील अक्षय भालेराव या तरुणांची हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीचे निवेदन चंदगड तालुका (जि .कोल्हापूर) येथील ब्लॅक पँथर पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार हेमंत कामत यांना देण्यात आले.

       यावेळी चंदगड तालुक्याचे गटविकास अधिकारी  चंद्रकांत बोडरे, ब्लॅक पँथर पक्षाचे तालुका अध्यक्ष  दिपक कांबळे, संस्थापक अध्यक्ष  सुभाष देसाई, पंडित कांबळे, सुधाकर कांबळे, वैजू कांबळे, सुरेश कांबळे, चाळोबा कांबळे, कुमाना कांबळे, लक्ष्मण कांबळे, विजय कांबळे, लक्ष्मण शेळके तानाजी शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment