उत्साळी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री विमा योजनेच्या कँम्पला ग्रामस्थांचा प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2023

उत्साळी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित प्रधानमंत्री विमा योजनेच्या कँम्पला ग्रामस्थांचा प्रतिसाद

उत्साळी येथे विमा योजनेच्या कँम्प वेळी उपस्थित ग्रामस्थ

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

         ग्रामपंचायत उत्साळी (ता. चंदगड ) येथे मंगळवारी प्रधान मंत्री विमा सुरक्षा योजना व प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना या सामाजिक योजनांचा कॅँम्प आयोजित करण्यात आला होता. या  कँम्पचा लाभ उत्साळीतील ग्रामस्थांनी घेतला. विमा योजनेचे महत्व यावेळी ग्रामस्थांना समजावून सांगितल्याने ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच सौ. माधूरी सावंत - भोसले, ग्राम पंचायत सदस्य, आशा सेविका, ग्रामसेवक, बँक ऑफ महाराष्ट्राचे बँक मित्र सौ. प्रियांका संदीप पवार, ग्रामपंचायत ऑपरेटर सुनिता गुरव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.No comments:

Post a Comment