छत्रपती शिवराय जनतेच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारे राजे - प्रा. ए. डी. कांबळे - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2023

छत्रपती शिवराय जनतेच्या हृदय सिंहासनावर राज्य करणारे राजे - प्रा. ए. डी. कांबळे

प्राचार्य पी.आर.पाटील छ शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करताना. शेजारी मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          'शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत साम्राज्य स्थापन केले. या साम्राज्यात १८ पगड तीच्या लोकांचा समावेश होता. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सर्व शत्रूंना नामोहरमकेले. खऱ्या अर्थाने रयतेचा राजा हे बिरुद त्यांना शोभून दिसते. 'असे प्रतिपादन ए. डी. कांबळे यांनी केले. ते येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात आयोजित ३५० व्या शिवराज्यभिषेक दिन कार्यक्रमात बोलत होते.

    अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी 'साडेतीनशे वर्षे होऊन गेली तरी महाराजांना व त्यांच्या कार्याला प्रचंड दाद मिळत आहे. अविरत संघर्षातून त्यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे त्यांचा  द्रष्टेपणा, नियोजन, चिकाटी या लोकोत्तर गुणांच्या मुळेच आजही त्यांचे जन मनावरील राज्य अबाधित आहे.' असे मत व्यक्त केले. प्राध्यापक प्रबोधिनीच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात संस्थेतील गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. एस. व्ही. कुलकर्णी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment