जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला चार सिल्वर मेडल - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2023

जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेला चार सिल्वर मेडल

 

मेडल व सर्टीफिकेट स्विकारताना भगतसिंग गावडे

भोगावती / सी. एल. वृत्तसेवा

       भोगावती (ता. राधानगरी) येथील सावली सोशल सर्कल यांच्या वतीने पार पडलेल्या  जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडे याने विविध प्रकारात चार सिल्वर मेडल पटकावली. त्याला रोख बक्षीस आणि मेडल देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    भगतसिंग याने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण आणि सिल्वर, कास्य  पदके मिळवली आहेत. सध्या तो बेळगाव येथील केएलई स्विमिंग क्लब मध्ये प्रशिक्षण घेत आहे. या  कामी त्याला केएलई इंटरनॅशनल स्कूल स्विमिंग पूल कुवेंपूनगर बेळगावचे अजिंक्य मेंडके, अजित जेंटीकट्टी, राजेश शिंदे, अतुल धुडूम, सतीश यादव तर रेणुका इन्फ्रास्ट्रक्चरचे मालक परशुराम काकतकर, प्रभाकर कोरे (अध्यक्ष, केएलई सोसायटी) आणि उमेश कलघटगी यांनी पाठिंबा व प्रोत्साहन दिले.

No comments:

Post a Comment