अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

10 July 2023

अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात पालक मेळावा संपन्न

 


आष्टा / सी. एल. वृत्तसेवा

       अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय आष्टा येथे  पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग प्रमुख प्रा. एस. एस. मोहिते होते.

      प्रा. सतीश लळित यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित पालक वर्गाचे स्वागत केले. यावेळी प्रथम वर्ष प्रथम सत्रात अभियांत्रिकी परिक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. सतीश लळीत यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी पालकांनी जागृत राहून शिक्षकांशी संवाद साधण्याचे आवाहन केले. विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. एस. एस. मोहिते बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी बेसिक सायन्स वि भागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये स्पाट स्किल ट्रेनिंग, सेल्प स्टडी क्लब, लक्ष मेंटॉरिंग यांच्या माध्यमातून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच विद्यार्थी सर्व गुण संपन्न घडवायचे असतील तर शिक्षकांनी ५० % विद्यार्थ्यांनी ३० % तर पालकांनी २० % प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगून यासाठी महाविद्यालय सर्वोतोपरी सहकार्य करील.

        यावेळी पालक एस. के. पाटील यानीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन  प्रा.अरविंद रासकर व प्रा. स्पप्नील रावळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिकेत पाटील यांनी केले. आभार प्रा. ए. जी. शिंदे व डॉ. एस. बी. माळी यांनी मानले. विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे पालक मेळावा उत्साहात पार पडला.

No comments:

Post a Comment