आता शाळेत आजोबा शिकवणार? सेवानिवृत्त शिक्षकांची शाळेत होणार पुन्हा नियूक्ती, ७० वर्षापर्यंत वयाची अट - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2023

आता शाळेत आजोबा शिकवणार? सेवानिवृत्त शिक्षकांची शाळेत होणार पुन्हा नियूक्ती, ७० वर्षापर्यंत वयाची अट




तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसंस्था
     जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये सेवा निवृत्त शिक्षकांची पुन्हा कंत्राटी पद्धतीने  तात्पूरत्या स्वरूपात नियुक्त्या करण्यात येणार असल्याचा आदेश शासनाने काढला आहे. विशेष म्हणजे ७० वर्षापर्यंतचा निवृत्त शिक्षक आजोबा यासाठी शिक्षक म्हणून पात्र ठरणार असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
     राज्यातील सर्व शाळा ह्या जून महिण्यात चालू झाल्या आहेत. पण जिल्हा परिषदेच्या शाळा मधील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे.  विद्यार्थी शाळेत पण शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच नियोजित शिक्षक भरती संदर्भात मा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाली असल्याने या प्रक्रियेस बिलंब  होणार आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून व पवित्र प्रणाली मार्फत नियमित शिक्षक भरती मधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील व खाजगी  शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळातील निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्वावर रिक्त जागी नेमणूक करण्यात येणार आहे.
     नियुक्ती साठी कमाल वयोमर्यादा ७० वर्षे ठेवण्यात आली आहे. यासाठी प्रतिमाह २० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. एकीकडे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत असताना दुसऱ्या बाजूला निवृत्त शिक्षकांना पुन्हा नियुक्त करणे हा अजबच प्रकार आहे. हजारो डी. एड, बी. एड. धारक बेकार असताना त्याना असे काम न देता निवृत्त कर्मचार्‍यांच्या नियूक्तीचे आदेश देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.


1 comment:

जोशी गुरुजी said...

बेरोजगार डी.एड प्रशिक्षित कुठे परदेशात गेले काय ?

Post a Comment