ग्रामपंचायतीच्या १५ वा वित्त आयोगातून शालेय पोषण आहार साठी भांडी - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2023

ग्रामपंचायतीच्या १५ वा वित्त आयोगातून शालेय पोषण आहार साठी भांडी


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
     ग्रामपंचायत कालकुंद्री (ता. चंदगड) कडून गावातील केंद्रीय प्राथमिक शाळेस सुमारे ३० हजार रुपये ची भांडी प्रदान करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठी शिजवला जाणारा मध्यान्ह पोषण आहार शिजवणे, वाटप करणे यासाठी लागणारी भांडी, कुकर असे उपयोगी दर्जेदार साहित्य ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून नुकतेच देण्यात आले. 
    सरपंच छाया जोशी, उपसरपंच संभाजी पाटील, ग्रामसेवक दत्ता नाईक यांच्यासह सदस्य विठ्ठल पाटील, प्रशांत मुतकेकर, विलास शेठजी आदींनी मुख्याध्यापक मोहन गाडीवड्डर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संदीप पाटील यांचेकडे साहित्य सुपूर्द केले. यावेळी शिक्षक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी आदींची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment