संत गजानन' मध्ये नव्या वैद्यकीय कोर्सची सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

11 July 2023

संत गजानन' मध्ये नव्या वैद्यकीय कोर्सची सुरुवात


महागाव / सी. एल. वृत्तसेवा

    महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहातील फार्मसी महाविद्यालय व भरारी डिजिटल सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने इंडस्ट्री बेस्ट ॲडव्हान्स सर्टिफिकेट सीपीटी 4 अँड आयसीडी 10 कोडींग सिस्टीम या नव्या कोर्सची सुरुवात केली  असल्याची माहिती विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी दिली.
     हे कोर्स वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असून यामध्ये रुग्णाची आरोग्य सेवेची माहिती,प्रक्रिया, निदान, उपकरणे आणि नोट्स मधून वैद्यकीय सेवा ची माहिती घेण्याची प्रक्रिया आहे. वैद्यकीय कोडर ही माहिती सार्वत्रिक वैद्यकीय अल्फान्यूमेरिक कोडमध्ये रूपांतर करतो कोर्स पूर्ण झाल्यावर वैद्यकीय कोडर म्हणून जगभरातील कोणत्याही वैद्यकीय सेवेत सर्वाधिक पॅकेजवर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहे.
     मुंबई व पुणे नंतर प्रथमच महागाव सारख्या ग्रामीण भागात  पहिल्यांदाच या कोर्सची सुरुवात केला असून यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आयटी कोडींग विशेष तज्ञाची येथे नियुक्ती करण्यात आला आहे. या कोर्सच्या प्रवेशासाठी फार्मसी, बी. एस्सी. किंवा एम. एस्सी. पदवीधर पात्र आहेत इच्छुक विद्यार्थ्यांनी 17 ऑगस्ट पूर्वी नाव नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा असे आवाहन डॉ. संजय चव्हाण यांनी केला आहे. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एच. किल्लेदार, प्रा. रूपाली परीट, प्रा. स्वप्निल हराळे, प्रा. अमरसिंह फराक्टे उपस्थित होते.


No comments:

Post a Comment