मुगळी येथे लक्ष्मण कांबळे यांचा पो. उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2023

मुगळी येथे लक्ष्मण कांबळे यांचा पो. उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

 

पीएसआय लक्ष्मण कांबळे यांचा सत्कार करताना दिपक कांबळे व मान्यवर

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        मुगळी (ता.चंदगड) येथील लक्ष्मण शिवाजी कांबळे यांची एम.पी. एस. सी. परीक्षेमार्फत पोलिस उपनिरीक्षपदी निवड झाल्याने त्यांचा संगमित्र युवामंच मुगळी व ब्लॅक पँथर पक्षाच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी  ब्लॅक पँथर पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, कोषाध्यक्ष सुधाकर कांबळे, वैजनाथ कांबळे, कृष्णा कांबळे, युवामंच अध्यक्ष सटूप्पा कांबळे, महादेव कांबळे, परशुराम कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध गावचे मान्यवर, मित्रमंडळी, महिला व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment