सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लजच्या हडलगे रोपवाटीकेतून ग्रामपंचायतीना रोपे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2023

सामाजिक वनीकरण परिक्षेत्र गडहिंग्लजच्या हडलगे रोपवाटीकेतून ग्रामपंचायतीना रोपे वाटप

 

हडलगे येथील सामाजिक वनिकरण विभागाची रोपवाटीका

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

   सामाजिक वनिकरण विभाग परिक्षेत्र गडहिंग्लजच्या हडलगे (ता. गडहिंग्लज) येथील रोपवाटीका केंद्रातून ग्रामपंचायतीना रोप वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक ग्राम पंचायतीला १ हजार रोपांचे वाटप करण्यात येत आहे.

    हडलगे घटप्रभा नदि शेजारी असणाऱ्या रोपवाटीकेमध्ये ४० हजार रोपे लागणीसाठी उपलब्ध आहेत. ग्राम पंचायतीना विनामूल्यू १ हजार रोपे देण्यात येत आहे. यामध्ये ग्राम सागवान - ५०, काजू - ५०, चिंच - २५०, करंज - २५०, जांभूळ - २५०, हेळा - १५० या रोपांचे वाटप केले जात आहे. त्याच बरोबर या रोपवाटीकेत बेल, मोहगुणा, वड, पिंपळ, आंबा, लिंबू , फणस, बांबू आदि वृक्षांची रोपे येथे आहेत.

No comments:

Post a Comment