मौजे कारवे येथील विवाहित महिलेचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारा दरम्यान मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

12 July 2023

मौजे कारवे येथील विवाहित महिलेचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारा दरम्यान मृत्यू

भागीरथी व्ही. नाईक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    चंदगड तालुक्यातील मौजे कारवे येथील रहिवासी भागीरथी व्ही. नाईक (वय -२२) या महिलेचा विषारी औषध पिल्यामुळे मृत्यू झाला आहे. ही घटना ११ जुलै २०२३ रोजी दुपारी घडली. तिने कोणते तरी विषारी औषध सेवन केल्याचे समजताच तिला नातेवाईकांनी उपचारासाठी बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तथापि तीचा उपचार सुरू असताना सायंकाळी ६.१० वाजता हॉस्पिटल मध्ये मृत्यू झाला.             भागीरथी नाईक हिचा पाच वर्षांपूर्वी विवाह झाला असून तिचे माहेर कर्नाटक मधील होते. तिच्या मृत्यूबद्दल माहेरच्या मंडळींनी संशय व्यक्त केला असल्याने या प्रकरणी चंदगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला आहे. माहेरकडील मंडळींनी ई-मेल द्वारे तक्रार नोंदवली आहे. मृत्यूनंतर बेळगाव येथेच तिचे विच्छेदन करण्यात आले. अंत्यविधी मौजे कारवे येथे होणार असून माहेरच्या मंडळींच्या तक्रारीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली. या प्रकरणी कलम १७४ प्रमाणे गुन्हा नोंद असून पोलीस सब इन्स्पेक्टर सतपाल कांबळे व पो. हे. कॉ. कोगेकर अधिक तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment