पोलीस पत्रकाराचा फोन जप्त करू शकत नाहीत : हायकोर्टाचा निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

13 July 2023

पोलीस पत्रकाराचा फोन जप्त करू शकत नाहीत : हायकोर्टाचा निकालचंदगड : सी. एल. वृत्तसेवा
     पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यांच्या मोबाईल मध्ये अनेक प्रकारची माहिती असू शकते. सीआरपीसी चा अवलंब केल्याशिवाय त्यांचा मोबाईल जप्त करता येणार नाही. असा निकाल केरळ हायकोर्टाचे न्यायमूर्ती पी. व्ही. कुन्हीकृष्णन यांनी एका प्रकरणांमध्ये नुकताच दिला आहे.
   जी विशाकन हे एका मल्याळम दैनिकात पत्रकार आहेत. ते राजकीय आणि चालू घडामोडी वर बातम्या देत असतात. एका गुन्हेगाराशी चांगले संबंध असल्याच्या संशयावरून ७ जुलै रोजी तीन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली आणि त्यांचा मोबाईल फोन जप्त केला. यावर पत्रकार विशाकन यांनी केरळ हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पत्रकारांचे गुन्हेगारांशी चांगले संबंध असणे हा त्यांच्या कामाचा एक भाग असू शकतो. त्यामुळे पत्रकाराने गुन्हा केल्याच्या संशय घेण्याचे कारण नाही. आमदार, खासदार किंवा राजकीय व्यक्तींच्या प्रभावाखाली येऊन पोलिसांनी पत्रकारांना त्रास देणे किंवा त्यांचा फोन जप्त करणे चुकीचे आहे. असे निरीक्षण केरळ हायकोर्टाने नोंदवले आहे. पत्रकारांना सर्व प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती असू शकते. म्हणून हे त्यांचा फोन जप्त करण्याचे कारण असू शकत नाही, असेही उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.


No comments:

Post a Comment