वाटंगी येथील राष्ट्रवादी च्या मेळाव्याला उपस्थित आमदार राजेश पाटील व कार्यकर्ते
आजरा / सी. एल. वृत्तसेवा
मतदार संघाचा विकास करत असताना अडचणी येतच आहेत. पण माझ्या भाजप प्रवेशाची केवळ चर्चाच चालू आहे. एकवेळ घरात थांबेन पण भाजपात प्रवेश करणार नाही, असं स्पष्टीकरण आमदार राजेश पाटील यांनी केले आहे.
वाटंगी (ता. आजरा) येथे आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आमदार राजेश पाटील बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजपर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रचंड निधी दिला. त्यामुळेचं त्यांच्यासोबत राहणार असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आमदार पाटील यानी यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात आजरा तालुका संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल देसाई आणि गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अभय देसाई यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी, मला मंत्रिपद नको पण मतदारसंघातील विकासासाठी निधी व राष्ट्रवादी पक्षाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य ठिकाणी संधी द्या अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलीय. त्यांनी त्याला मान्यताही दिली असल्याचं आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं.
या मेळाव्याला जनार्दन बामणे, भीमराव वांद्रे, धनाजी दळवी, तानाजी राजाराम, एम एस पाटील, सुभाष देसाई, मधुकर यलगार यांच्यासह आजरा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment